टागोरांच्या अतीतीव्र संवेदनेची नस पकडायला थोडा नेट लावावा लागतो. पण मोलाचे, तुम्हाला श्रीमंत करणारे काही आत मुरवायचे, तर थोडी किंमत मोजायला हवी नं?
इथे टागोरांची सगळीच वर्णने, संभाषिते इतकी काव्यमय, चित्रदर्शी, चिंतनशील आहेत की, सगळीच पानं रंगायला लागली, तसा नाद सोडला. यात अनुवादक विलास गिते यांचे श्रेयही मोठे. ज्या भाषेतून अनुवाद करायचा ती भाषा नुसती येणं, तिचा आपल्या भाषेत अर्थ लावता येणं, ही प्राथमिक, जुजबी बाब. पण मूळ भाषेत कालौघात, सांस्कृतिक घुसळणीत घडत गेलेले बदल लक्षात यायला हवेत. नाहीतर अर्थ पोचवता येईल, पण मुळातला वाचनानुभव?.......